Born in the year 1970, Father Ramrao Nistane and Mother Sudhatai Nistane. Shrikant says, “They gave me gift of hard work, honesty and empathy”
Family Wife: Vrushali Nistane- “True second half supporting during all times” says Shrikant Son1: Dhruva Nistane , Son 2: Arya Nistane
Shrikant founded Crave InfoTech to apply his expertise and relationship with SAP and Zebra in a manner appropriate to the scale and needs of all industry segments through Digital Transformation, enterprise mobility, Analytics, AI, ML, IoT, Blockchain, S/4 HANA and Business One.
Shrikant wants Crave InfoTech to be a touchstone for the IT industry. He motivates his team to tackle problematic challenges that come with each new wave of disruption.
“My 27+ years of industry experience has guided Crave InfoTech to produce mobility and UI_UX solutions which help our customers achieve improved efficiency. We understand mobility enterprise transformation, including connections with ERP, middleware, mobile hardware, user interface, radio networks, and connectivity systems.
“Our Enterprise 50+ pre-packaged solutions including Asset Management (EAM), Warehouse Management (WMS) and Direct Solution Delivery (DSD) integrate advances in mobility computing using SAP’s Cloud Platform, Leonardo and Digital Core. These specialized solutions for Life Sciences, Manufacturing, O &G, Logistics, Distribution and Utilities sectors companies include built-in workflow and offline capabilities that improves the efficiency and eliminates papers.
Crave InfoTech’s combine expertise in SAP ERP and Zebra Hardware along with 50+ pre-packaged apps provides an unique opportunity to serve customer needs for transitioning from Windows to Android, simplified User Interface and simplified system architecture – all in one go.
Shrikant believes his Crave InfoTech team is making a difference in digital transformation, but he has also set as priority his firm’s striving to better the global community by helping to run a home for more than 50 poor and underprivileged children in India.
https://www.youtube.com/channel/UC79m4MLImevEyp4qe_cdn5A
आव्हानांना संधीत रूपांतरित करणारा उद्योजक: श्रीकांत निस्ताने
– डॉ. रवींद्र जोशी
‘२०२० हे आव्हानांचं वर्षे राहील, जे कमजोर असतील ते संपतील आणि जे बळकट व नियोजनात्मक असतील ते टिकतील. करोनाचे उद्योगावर दुरोगामी परिणाम होत आहेत. आम्ही आमचे प्रॉडक्ट, कार्यपद्धतीत बदल करून पुनर्स्थापित करत आहोत. पूर्वीपेक्षा जास्त काम करुन पुढील दहा वर्षाचे नियोजन व त्याप्रमाणे कार्य चालू आहे. करोनासारख्या परिस्थिती आव्हानात्मक असतात आणि त्यातच संधीसुद्धा तयार होत असतात. सुदैवाने आमचे काम ‘वर्क फ्रॉम होम’ आहे. कोणालाही ताळेबंदी केली नाही किंवा पगार कपात केला नाही, याउलट आम्ही पगार वाढ देण्याच्या प्रयत्नात आहोत. आमची टीम बळकट आहे आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी तत्पर आहे,’ असे क्रेव्ह इन्फोटेकचे सीईओ आणि हार्प कॅपिटल ग्रुपचे संस्थापकीय सदस्य श्रीकांत यांनी सांगितले. आव्हानांना संधीत रूपांतरित करणारे, जागतिक उद्योजक श्रीकांत निस्ताने हे एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडचे १९९१ बॅचचे इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे माजी विद्यार्थी आहेत.
तो मूळचा वर्ध्याचा आणि शेती हा कुटुंबाचा मूळ व्यवसाय. आजोबांनी महात्मा गांधींसोबत वर्ध्यात काम केले होते. तसेच अनेक वर्षे ते गावात सरपंच होते. लोकांना मदत करत राहणे, तंटे मिटवणे, हे श्रीकांत जवळुन पहात होता. त्यामुळे त्याच्या बालपणात आजोबांचा प्रभाव खूप होता. वडील कृषी अधिकारी असल्यामुळे नांदेड, हिंगोली येथे नोकरीला होते. श्रीकांतचे सातवीपर्यंतचे शिक्षण शारदा भवन संस्था नांदेड येथे झाले. वडिलांची बदली वर्ध्याला झाली, तेव्हा गांधीजींची विचारसरणी असलेल्या शाळेत वर्ध्याला आठवीत प्रवेश दिला. तिथे खादी पोशाख, गांधी टोपी व गांधींच्या विचारसरणीत बारावीपर्यंत शिक्षण झाले. परत १९८७ साली एसजीजीएस नांदेडला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगला प्रथम वर्षात प्रवेश मिळाला.
कॉलेजला फीस कमी आणि राष्ट्रीय प्रावीण्य शिष्यवृत्ती जास्त मिळायची, त्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण जवळपास मोफत झाले. कॉलेजला वसतीगृह नसल्यामुळे भाग्यनगरमध्ये रूम घेऊन राहत होता. ते घर सुद्धा वसतीगृहासारखेच मोठे होते. गेटच्या जवळील रूममध्ये सर्वजण खाण्याच्या डब्यावर तुटून पडायचे. शेवटी आलेला बाकीच्या रूममध्ये डबा शोधत फिरायचा, अशी दंगामस्ती, हसीमजाक सुद्धा खूप केली. बालपणी आजोबांसोबत गावातील राजकारण पाहिले असल्यामुळे कॉलेजच्या राजकारणात त्याला आवड होती. श्रीकांतच्या सोबत मित्रांचा एक गट असायचा, ते त्याला महाविद्यालयीन विद्यार्थी संघटना व इतर अनेक उपक्रमात अग्रगण्य भूमिका व प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रोत्साहित करायचे. तंत्रज्ञाना व्यतिरिक्त कॉलेजमध्ये खूप काही शिकायला मिळाले. लोकांशी संपर्क साधणे, लोकांना एकत्रित ठेवणे, लोकांशी कसे जुळवून घ्यायचे, लोक व्यवस्थापन, आव्हाने स्विकारणे, या कौशल्यात्मक मूळ गोष्टींचा विकास विद्यार्थी दशेत झाला. त्यामुळे जागतिक पातळीवर उद्योग करण्याची पायाभरणी येथे झाली होती. कॉलेजमध्ये तलवार सर, कामठाणे सर आणि इतर आदरणीय शिक्षकांचे विद्यार्थी जीवनात सातत्याने मार्गदर्शन लाभले. इंजिनिअरींग झाल्यानंतर सुरुवातीचा काळ कठीण होता कारण १९९१ साली इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांना नोकरी मिळणे कठीण होते. अनेक महिने श्रीकांत हा आमदार निवासात राहायचा. काही दिवस येलो पेज जाहिरातींमध्ये काम केले, त्यामुळे मुंबईला राहण्याचा खर्च भागत होता. संधीचा शोध चालूच होता. जाहिरात आली आणि व्हिनायल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड महाड जो पिडिलाइट गटाचा एक भाग आहे, त्या अत्याधुनिक प्लांटमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी लागली आणि त्याच्या स्वप्नांना भरारी मिळाली. सुदैवाने नोकरीच्या सुरुवातीला, श्री मोहंती हे चांगले बॉस व मार्गदर्शक मिळाले. त्यांना माणसे ओळखण्याची कला होती आणि त्यांनी श्रीकांतमध्ये नेतृत्वगुण पाहिले. ते महाड इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष झाले. श्रीकांत हा त्यांचा खास विश्वासातला, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व इतर कामे, तो नोकरी करून आवडीने करायचा. त्याची प्रकल्प विभागाला बदली झाली. पिडिलाइटच्या प्रोजेक्ट निमित्त अनेक ठिकाणी भेटी दिल्या. सरांचा विश्वासु असल्यामुळे अनेक संधी व मोकळीक मिळाली. पुढे मोहंती सर इन्स्ट्रुमेंटेशन सोसायटी ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष झाले आणि श्रीकांतला ऑल इंडिया सेक्रेटरी पदाची जबाबदारी त्यांनी दिली. कमी वयातच उच्चस्तरावरती काम, मोठ्या लोकांशी संपर्क, कॉन्फरन्सचे आयोजन, भारतात अनेक ठिकाणी प्रवास, यामुळे त्याचा दृष्टिकोन व्यापक झाला आणि पाच वर्षे काम केल्यानंतर जागतिक संधीच्या शोधात होता. श्रीकांतला नैतिकतेने उद्योगांमध्ये भरीव प्रगती करायची होती. व्यापक दृष्टिकोन मिळालेल्या महत्त्वकांक्षी अभियंत्याला कुवैतमध्ये एका अमेरिकन कंपनीत पहिली परदेशी संधी मिळाली आणि १९९५ साली त्याने भारत सोडले. अत्याधुनिक महाकाय असा तो कारखाना होता. दीड वर्ष मन लावून खूप काम केले आणि कमी कालावधीतच तो तिथे चमकला. एसएपी शिकण्याची संधी त्याला मिळाली, संधीचे सोने करणाऱ्यांपैकी तो एक. १९९५-९६ च्या काळात ‘सॅप’ हा शब्द उच्चारला की नोकरी मिळायची. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाला. स्वतःची कंपनी सुरू केली, चार-पाच वर्षे तो चांगल्यारितीने प्रगती करत होता, २००० साली जागतिक मंदी आली आणि त्याला ती कंपनी बंद करावी लागली.
तो नवीन संधीच्या शोधात होता, तेव्हा सिंगापूरला जॉइंट व्हेंचर सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर हॉंगकॉंग, न्यूझीलंड येथे काम केले. अमेरिकेत चांगल्या कंपनीसोबत चार ते पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान स्वतःच्या उद्योजकता विकासासाठी, जगातील नामांकित बॅबसन कॉलेज बोस्टनमधून एमबीए केले. त्यानंतर २००७ साली क्रेव्ह इन्फोटेक नावाची कंपनी सुरू केली, तो या कंपनीचा संस्थापक व सीईओ आहे. आज या कंपनीचे न्यू जर्सी अमेरिका, नायजेरिया, भारतात नागपूर आणि पुणे येथे कार्यालये आहेत. यात १२५ कर्मचारी कार्यरत आहेत. सुरुवातीचा काळ कठीण होता, ९७% प्रॉडक्ट फेल गेली, परंतु ३% यशस्वी झाली आणि २०११ पासून या कंपनीने व्यवसायात भरारी मारली. श्रीकांतला आनंद वाटतो की त्याने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने व्यवसायात छान प्रगती केली आहे. त्याची पत्नी वृषाली आणि बहीण कल्पना (एसजीजीएसची १९९८ बॅचची माजी विद्यार्थिनी) सुद्धा या व्यवसायात भागीदार आहेत.
यशोशिखरे गाठत असताना चिन्मय मिशनचे स्वामी दयानंद सरस्वतीच्या सानिध्यात तो आला, त्यामुळे अध्यात्माचे व वेदांचे मार्गदर्शन लाभले. अमेरिकेत श्रीकांतची दोन्ही मुले लहानाची मोठी झाली असली तरीही त्यांना भारतीय संस्कृतीचे संस्कार मिळाले. समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते, यासाठी तो नेहमीच धडपडत असायचा. ‘एम फॉर सेवा’ या धर्मदाय संस्थेअंतर्गत, वर्धा येथे जागा घेऊन वसतिगृह बांधून दिले. वंचित कुटुंबातील ५२ मुलं दत्तक घेतली आहेत. ती मुले येथे राहतात आणि वर्ध्यात शाळेत शिकतात. त्यांचा सर्व खर्च श्रीकांत उचलतो. समाजसेवेची आवड असणारी त्याची पत्नी सर्व नियोजन पाहते. ‘सामाजिक कार्य आणि अध्यात्म यामुळे मनाला शांती मिळते’, असे तो सांगतो. श्रीकांतचा असा विश्वास आहे की अवास्तव अपेक्षा व खर्च या निराशेच्या मूळ कारण असतात, त्यामुळे तो सुखी व आनंदी राहण्यासाठी साधे, सरळ आणि कमी खर्चाचे जीवनमान जगतो.
उत्तरोत्तर प्रगती चालू होती. २०१८ साली जागतिक अव्वल सात ते आठ व्यावसायिक एकत्र आली. यांनी हार्प (एचएआरपी) कॅपिटल ग्रुपची स्थापना केली, यात श्रीकांत हा संस्थापकीय सदस्य आहे. हा ग्रुप तोट्यात असलेली तारांकित हॉटेल्स विकत घेतो आणि त्यांना नफ्यामध्ये परावर्तित करतो, त्यामुळे या ग्रुपची अवघ्या दोन वर्षात वार्षिक उलाढाल १०० अमेरिकन मिलियन डॉलरच्यावरती आहे आणि ३०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. यशोशिखरे गाठत असताना मध्यंतरीचा काही काळ खडतरीचा होता. तरीहीपण समांतरपणे व्यवसायाची उभारणी व प्रगती पण चालू होती. अध्यात्मामुळे आणि सत्कार्यामुळे कुटुंबाची प्रगती सुद्धा संस्कारित झाली आहे. यात पत्नीचे फार मोठे योगदान आहे. दोन्ही मुले अमेरिकेतील अव्वल क्रमांकाच्या निवासी शाळेत शिकली. मोठा मुलगा वॉर्टन बिझनेस स्कूलमध्ये पदवीला शिकत आहे.
शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी नित्यनियमाने वॉकिंग, व्यायाम श्रीकांत करत असतो. आहारावर उत्तम नियंत्रण आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ घालवणे, प्रवास आणि गोल्फ या त्याच्या आवडीच्या गोष्टी. एसजीजीएस मधून उत्तीर्ण झाल्यापासून मागील तीस वर्षांच्या कालावधीत सात देशात नोकरी व व्यवसाय केला आहे. जवळपास जगभरात प्रवास झाला आहे. तो ‘मल्टी इन्कम सोर्स’ वर भरोसा ठेवतो, एका बास्केटमध्ये पैसा कधीच ठेवत नाही, हेच त्याच्या यशाचे गुपित आहे. रियल इस्टेट, शेअर मार्केट, सॉफ्टवेअर कंपनी, हॉटेल्स अशा अनेक क्षेत्रात त्याची गुंतवणूक आहे.
श्रीकांत हा एसजीजीएस महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करतो, ‘माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन एक बळकट संघटन तयार करण्याची आज फार आवश्यकता आहे, जेणेकरून या नेटवर्कचा भविष्यात तयार होणाऱ्या अभियंत्यांना उपयोग होईल. यातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, प्लेसमेंटसाठी मदत करणे, औद्योगिक प्रोजेक्ट देणे, स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करणे, माजी विद्यार्थ्यांना सुद्धा व्यवसायात एकमेकांना मदत करणे, गरजू विद्यार्थ्यांना व तसेच माजी विद्यार्थ्यांना सुद्धा आर्थिक मदत करणे, असे अनेक उपक्रम हाती घेता येतील. उत्तर अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचा माझा पहिला प्रयत्न, माझ्या वैयक्तिक अपेक्षांपेक्षा कमी झाला आणि त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. हे नेटवर्क एकत्रितपणे जोडण्यासाठी व अनेक महत्त्वाची कामे करण्यासाठी महाविद्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावणे, अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून संस्थेच्या वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचे सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान राहील आणि आपण सुद्धा संस्थेला गिविंग बॅक केला, याचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटेल.’
यशोशिखरे गाठलेला श्रीकांत तरुणांना सांगतो, ‘आज जिथे मी आज आहे ते पालकांच्या परिश्रमांमुळे, मित्र आणि नातेवाईकांच्या शुभेच्छांमुळे. ज्यांनी आपल्याला आयुष्यात मदत केली, त्यांना नेहमीच लक्षात ठेवा. नेहमी गरजूंना मदत करा कारण उद्या ती व्यक्ती दुसर्यास मदत करेल आणि मदत श्रृंखला वाढेल. आज आयटी युगातले तुम्ही; पैसा, तंत्रज्ञान, सुविधा, आधार देणारे आई-वडील, अशा अनेक गोष्टींनी संपन्न व आशीर्वादित आहात. त्यांची किंमत ओळखायला शिका. जगात हुशार व श्रीमंत माणसांची कमतरता नाही, आज चांगल्या माणसांची जगाला आवश्यकता आहे. करोनाने सिद्ध करून दाखविले की तुम्ही करोडपती असाल तरी सामान्य आहात. हुशार आहात पण कमजोर असाल तर संकटसमयी तुम्ही संपणार, बळकट असेल तरचं टिकणार. चांगली माणसे आयुष्यात यशस्वी होतचं असतात. आयुष्यात संघर्ष आपणच तयार करतो कारण आपल्या अपेक्षा व गरजा मोठ्या असतात, त्यांची पूर्तता नाही झाली की त्याला आपण संघर्ष समजतो, त्यामुळे तणाव घेऊन निराश होतो, तो संघर्ष नसून एक व्यवहार असतो. त्यामुळे स्वप्न व ध्येय मोठी ठेवा, परंतु अपेक्षा व गरजा मर्यादित ठेवा, जेणेकरून सुखी व आनंदी आयुष्य तुम्हाला जगता येईल. चांगलं व्यक्तीमत्व बना, त्यामुळे आयुष्यात आपोआपच शिखरावर पोहचाल.’
(एसजीजीएस आयकॉन या पुस्तकातील एक लेख. लेखक, डॉ रविंद्र जोशी, प्राध्यापक वस्त्रतंत्र विभाग, एसजीजीएस नांदेड)