Dr. Sanjay Paithankar

Dubai

Qualification - MBBS, MD

Mobirise

About -

Dr. Sanjay Paithankar

MBBS, MD GOVERNMENT MEDICAL COLLEGE NAGPUR

CEO, Managing Director, Right Health UAE

Businessman, Human being and Healer.

Dr Sanjay Paithankar is a rare combination of businessman, human being and healer. He recognizes that there are souls to be saved and money to be made by offering inexpensive medical care to low-income groups. He has changed the concept of subsidized medical care in the UAE by setting up several cut-price but quality clinics for low-income people. His philosophy is guided by the imperative to give back to society.

Right Health is the largest and fastest-growing value healthcare organization in the UAE, and the pioneer of a movement to provide quality, affordable and accessible healthcare to the working-class population. In line with the goal of the National Agenda of the UAE Vision 2021 to establish a world-class healthcare system accessible to all, the organization aims to deliver quality healthcare with four core objectives – prevention, efficiency, effectiveness and innovation.

Right Health believes that all lives have equal value, and all people without distinction deserve equal care, compassion and commitment. Its experienced team of specialists and strategic partners boasts a solid track record and a long-term vision to create a platform that facilitates change and impact. Committed to transforming value-based healthcare, the organization is set to touch more than 1.8 million lives by 2022.

On occasion International Women’s Day in 2018, Dr Sanjay Paithankar said: “International Women’s Day offers an ideal opportunity to celebrate the women in our workforce, who devote countless hours of their time to the business in addition to caring for their families. We are indeed privileged to have exceptional female doctors, nurses, administrators, and financial and marketing experts in our ranks and continuously strive to empower them to be the best they can be. With the continued support of our female staff, we are confident to reach our mark of serving one million people by 2022.”

Women and girls’ empowerment is a major focus of the UAE National Strategy to be achieved by 2021. It is estimated that women make up 66 percent of UAE public sector workers, with approximately 30 percent in leadership roles. It is also projected that women comprise 75 percent of the workforce in education and healthcare in the UAE.

Right Health is aiming to fill gaps in healthcare services for working women, and is actively targeting several clinics in ‘women only’ labor camps within the UAE. The company is already in advanced discussions with the Sharjah Labor Authority.

सहृदयी हृदयतज्ञ —डॉ संजय पैठणकर

मेघना अशोक वर्तक meghana.sahitya@gmail.com

सर्वसाधारणपणे मराठी माणूस हा खरं तर नोकरी धार्जिणा !आपली नोकरी बरी आणि आपला संसार बरा,अशी त्याची वृत्ती ! एव्हढं धारिष्ट्य कसं काय दाखवायचं या विचाराने सदैव ग्रासलेला! एखाद्या व्यवसायात उतरावं असे १०० तल्या फक्त २% लोकांना वाटते.आणि अशी ही २% लोकंच धंदा सुरु करण्याचे साहस दाखवतात आणि सिध्दही करुन दाखवतात की मराठी माणूस सुध्दा सर्व परिस्थिती  अनुकूल असताना व्यवसायात यशस्वी होऊ शकतो मात्र स्वभूमित,आप्तपरिचित जवळ असताना ! परंतु परदेशात,तेथील प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन ,तेथील कायदा आणि नियमांचा बडगा सांभाळत,यशस्वी वाटचाल करणाऱ्या मराठी उद्योजकांचे अधिकच कौतुक वाटते.अशा यशस्वी उद्योजकांमध्ये दुबईस्थित डॉ संजय पैठणकर यांचे नाव घ्यावे लागेल.

एक यशस्वी व्यावसायिक,कुशल डॉक्टर आणि संवेदनशील मन या त्रयींचा संगम असलेले एक उमदे व्यक्तिमत्त्व म्हणजेच डॉ संजय मुकुंद पैठणकर !आज मराठी माणूस हा जगभर आपल्या कर्तृत्त्वाने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करत आहे.मग ते क्षेत्र कोणतेही असो संशोधन,अर्थ शास्त्र,वैद्यकीय शास्त्र —प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचे योगदान मोलाचे आहे.असाच सेवावृत्तीने झपाटलेला ,ध्येयपूर्तीसाठी वेडा झालेला एक योगी म्हणजे डॉ संजय पैठणकर ! आपण जे काही कमावतो त्यातील काही हिस्सा तरी समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करुन,समाजाप्रती असलेले ऋण फेडायचे या विचाराने वेडा झालेला एक डॉक्टर !

दुबई शहर हे एक ओसाड वाळवंट होते.तेलाचा शोध लागला आणि आखाती देशांमध्ये प्रगतीला सुरवात झाली.सर्व प्रथम रस्ते,इमारती यांच्या कामाना सुरवात झाली.दुबईच्या प्रगतीचा कणा म्हणजे site वर काम करणारा कामगार वर्ग !त्याकाळी दुबईत कोणत्याही प्रकारचे कायदे किंवा नियम नव्हते.आणि त्यामुळे ह्या अशिक्षित कामगार वर्गाचे अतोनात हाल होत असत.भर उन्हाळ्यात,रणरणत्या उन्हात ४०/४५ डिग्री सेल्सि तपमान असताना काम करणारा कामगार वर्ग ! केवळ आपल्या कुटुंबाच्या तोंडात सुखाचे चार घास पडावेत म्हणून मायदेश सोडून,आपल्या माणसांपासून दूर येऊन भविष्याची सुंदर स्वप्न बघणारा अशिक्षित कामगार ! आखातातल्या उन्हाळ्याशी झुंजत काम करणाऱ्या,तुटपुंजे उत्पन्न असलेल्या ह्या कामगारांच्या दृष्टीने तर डॉक्टर संजय म्हणजे देवदूतच ठरले !

जुलैचा महिना होता,भर उन्हाळ्याचे दिवस होते.त्यांच्या क्लिनिक मध्ये,तापाने फणफणलेल्या,चक्कर येऊन पडलेल्या एका कामगाराला त्याच्या इतर सहकऱ्यांनी आणले.रणरणत्या उन्हात सतत काम केल्याने त्याला डिहायड्रेशन झाले होते आणि तातडीने औषधोपचाराची गरज होती.डॉक्टरांच्या क्लिनिक मधील सर्व टीम लगेच कामाला लागली.दोनतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तो कामगार बराच सावरला आणि बोलायला लागला.पण पहिले वाक्य तो बोलला ‘ डॉक्टर तुमची फी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत हो ‘ ,आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर आश्वासक थोपटले आणि त्याला सांगितले की काळजी करु नकोस,तुझा पुढच्या महिन्याचा पगार झाला की तू फी दे,आणि ते ही नाही जमले तरी चालतील,तू अजिबात पैसे देऊ नकोस,काही हरकत नाही.

दुसऱ्याच महिन्याच्या सुरवातीला तो कामगार बरा होऊन डॉक्टरांना भेटायला म्हणून आला.त्याने फी दिली आणि डॉक्टरांच्या पायावर डोके ठेवून म्हणाला,डॉक्टर तुम्ही केवळ मला बरे केले नाहीत तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला जीवनदान दिले आहे.त्यादिवशी मला जर काही झाले असते तर माझ्या बायकामुलांनी काय केले असते ?घरात मी एकटाच कमावणारा आहे.म्हातारे आईवडील आहेत.सर्वांच्या तोंडात सुखाचा निवारा पडावा म्हणून मायेचे पाश दूर करुन मी इथे आलो.मी एकटाच नव्हे तर माझ्यासारखे अनेक कामगार आहेत.भविष्यात चांगले दिवस दिसतील ह्या आशेवर आम्ही सर्व आलो आहोत.मला बरे नसताना तुम्ही सर्वानी माझ्यासाठी जे काही केलेत ते पाहून सर्वच कामगारांना आधार वाटला आहे की या रखरखीत उन्हात प्रेमाच्या आधाराची सुखद झुळूकही येऊ शकते.आणि म्हणूनच आम्ही सर्व तुमचे सदैव ऋणी आहोत.

आणि —आणि त्या कामगाराची ती अवस्था पाहिली,त्याचे कृतज्ञतेचे विचार ऐकले आणि इथेच एक संवेदनशील मन हेलावले गेले.कमी उत्त्पन्न असलेल्या कामगारांसाठी क्लिनिक उभे करायचे,कमी शुल्क घेऊन त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यायची,आणि तेव्हढी फी देणे सुध्दा कोणाला शक्य नसेल त्यांना मोफत सेवा द्यायची,हे स्वप्न इथेच आकार घेऊ लागले.

नागपुरचे डॉक्टर मुकुंद त्र्यंबक पैठणकर यांचे सुपुत्र म्हणजेच हृदयतज्ञ डॉ. संजय पैठणकर ! नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे गोल्ड मेडलिस्ट ! MBBS ची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणही MD नागपूरच्या सरकारी महाविद्यालयातून केले आणि या परीक्षेतही सुवर्ण पदाचे ते मानकरी ठरले.त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी इंजिनिअर व्हावे,डॉक्टर बनून सरकारी नोकरी करू नये.पण नियतीच्या मनातील योजना वेगळीच होती.ते डॉक्टर झाले आणि नोकरीसाठी म्हणून मुंबईत आले.मुंबईतील त्यांचे वास्तव्य हे त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले.

नागपूरहून एकदम मुंबईला नोकरीसाठी येणे हे त्याकाळात खरोखर धाडसच होते.मुंबईतील विविध प्रांतातील लोकं,रेल्वे बसेसचा प्रवास,यंत्राप्रमाणे चालणारे मुंबईचे गतिमान जीवन ह्यासर्वाशी ताळमेळ जमवणे हे नागपूर सारख्या संथ,शांत शहरातून आलेल्या मुलाला कठीणच होते.पण मनाचा निश्चय होता आणि जिद्द होती.यांच्या बळावर मुंबईतील खडतर जीवनास सुरवात झाली.मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘ जसलोक ‘हॉस्पिटल मध्ये नोकरी सुरु झाली.कामाचा अनुभव आणि अनेक मोठ्या लोकांशी ओळखी होण्याचा योग आला.धीरुभाई अंबानी!एक असाधारण व्यक्तिमत्त्व !आपल्या आयुष्यात अश्या काही व्यक्ती भेटतात की त्या बरेच काही शिकवून जातात,जगण्याची ऊर्जा देतात.धीरुभाईंची भेट ही डॉक्टरांच्या दृष्टीने अविस्मरणीय अशीच ठरली.जसलोक मध्ये उपचारासाठी बरीच अरबी लोकं यायची.त्यांच्याशीही ओळखी झाल्या.आखाती देशांबद्दल त्यांच्याकडून बरीच माहिती मिळत होती.थोडीफार अरबी भाषा बोलायलाही डॉक्टर शिकले.१९८७मध्ये सौदी अरेबियातील जेद्दा येथील हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्याचा करार सौदी आणि जसलोक यांच्यामध्ये झाला.त्याकाळात आखाती देशांबद्दल बरेच अपप्रवाद होते.आणि त्यामुळे लोकं जायला तयार होत नसत.पण दूरदृष्टी असलेल्या आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची जिद्द असलेल्या डॉक्टरांनी ह्या संधीचे सोने केले.भविष्यातील त्यांच्या पुढील कार्याचा पाया इथेच घातला गेला. इथे त्यांनी ६ महिने नोकरी केली.पण त्या काळात त्यांनी घेतलेल्या अनुभवाने त्यांची पावले पुन्हा वाळवंटाकडे वळली.मुंबईत परत जाऊन नंतर काही काळ ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये काम केले. तिथेही पुन्हा अरबी पेशंटशी संपर्क आला आणि डॉक्टरांनी यूएई ही आपल्या जीवनाची पाऊलवाट नक्की केली.

१९८७ ते १९९८ ह्याकाळात प्रथम अबुधाबी नंतर शारजा आणि नंतर दुबई अशी पूर्ण यूएई भर ठिकठिकाणी नोकरी करताना तेथील लोकं,त्यांचे जीवनमान,त्यांचे स्वभाव यूएईतील  कायदेकानू नीतिनियम ह्या सर्वांची माहिती करून घेतली.त्यामुळे स्थानिक अरबी लोकांशी संवाद साधता आला तसेच अनुभवातही मोलाची भर पडली .१९८८ ते ९४ या काळात अनेक सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स मधून काम केले.१९९४ मध्ये दुबईच्या सरकारी  हॉस्पिटलमधील  ‘ Emergency Medicine ‘ या विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली.हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कामगार पेशंटचे जीवन इथेच जवळून बघता आले ,त्यांच्या अडचणी जाणून घेता आल्या.

ह्याचवेळी कामगार पेशंटशी  बोलताना त्यांच्या हे लक्षात आले की लेबर कॅम्प पासून जवळच जर क्लिनिक सुरु केले तर त्याचा फायदा कामगारांना घेता येईल.खरं म्हटलं तर एखाद्या पॉश लोकॅलिटीत एखादे अद्ययावत क्लिनिक डॉक्टर काढू शकत होते,पण मग कमी उत्पन्न असलेल्या कामगार वर्गासाठी,त्यांना परवडेल अशी उत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्याचे स्वप्न त्याना पूर्ण करता आले नसते !

दुबईत कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे.आजच्या दुबईच्या प्रगतीत त्यांचा वाटा फार मोठा आहे पण त्यामानाने त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा फारच कमी होत्या.आज आता दुबई सरकारने अनेक सुविधा केल्या आहेत,नवीन कायदे नियम केले आहेत.पण १९८०–९० चा काळ असा होता की कोणतेही कायदेकानू नव्हते.तुटपुंजा पगार,त्यातही एजन्ट लोकांनी भारतात,दुबईत येण्याआधीच पैसे घेतलेले असत.इथे आल्यानंतरही एजन्ट लोकांनी फसवलेले त्यांच्या लक्षात येत असे.पगार कमी,कामाचे स्वरुप वेगळे,आहे त्या परिस्थितीत काम करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच उरत नसे.५०डिग्री सेल्सि.तपमानाच्या भट्टीत काम करणारा हा कामगार !छोट्याश्या खोलीत बंकबेड घालून १०/१२ माणसे राहायची.इतरही आवश्यक सुविधा पुरेशा नव्हत्या.त्वचेच्या समस्या,आरोग्याच्या समस्या ,लहान जागेत राहत असल्याने डोक्याला होणाऱ्या जखमा सतत भेडसावत होत्या.कामाच्या site वरही वाईट परिस्थितीच ! हे कामगार आपल्या घरापासून,मुलाबाळांपासून दूर केवळ एकाच आशेवर जगत होते की निदान मुलाबाळांचे भविष्य तरी प्रकाशमान असेल !

पण जेव्हा तो स्वतःच आजारी पडतो तेव्हा हॉस्पिटल पर्यंत पोहोचणे त्याला अशक्य होते.कामाच्या ठिकाणाहून हॉस्पिटल लांब—त्यात टॅक्सी भाडे परवडत नव्हते—त्याकाळी आजच्या सारख्या बसेस ,किंवा मेट्रो सर्व्हिस नव्हती.होत्या त्या शेअर टॅक्सी फक्त ! कामाच्या ठिकाणी रजा तिथे पण पगार कापला जायचा कारण त्याकाळी medical leave वगैरे नियम नव्हते ! त्यातच घरी भारतात पैसे पाठवायचे कारण कमावणारी एकच व्यक्ती त्या कुटुंबात असायची.७००/८०० रुपये मासिक वेतन मिळणाऱ्या कामगाराला आजारी पडणेच परवडण्यातले नव्हते.आजारी पडलो तर घरी पाठवायचे काय ही सततची चिंता होती.ही सर्व परिस्थिती कार्पेंटर कामगार रामप्रसाद आणि ए.सी.टेकनिशिअन मंहमद घोष यांनी डॉक्टरांना सांगितली.आणि ती ऐकूनच डॉक्टरांनी मनाशी निश्चय केला.आणि त्यांच्या ह्या निश्चयाला सर्वार्थाने साथ दिली ती त्यांची पत्नी रोझी हिने ! आजही वटवृक्षा प्रमाणे पाळेमुळे दूरवर पसरलेल्या त्यांच्या व्यवसायाचा प्रशासकीय कारभार त्या सांभाळतात

१९९४ रोजी डॉक्टर पैठणकरांनी अजमान येथे ‘न्यू सानिया ‘ या नावाने पहिले क्लिनिक आणि फार्मसी सुरु केली.तिथे एक मोठी garment industry होती.खूप मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग तिथे राहत होता.आणि म्हणून त्या कारखान्याच्या जवळ त्यांनी आपले पहिले क्लिनिक उभारले.फी घेतली फक्त १०/१५ दिरहम ! consultation आणि medicine ! कारखान्याच्या जवळ क्लिनिक असल्यामुळे कामगारांच्या दृष्टीने अतिशय सोयीस्कर झाले.डॉक्टरांची फी कमी, बाकीचे खर्च वाचले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफकडून मिळणारी आपुलकीची प्रेमाची वागणूक ! बघता बघता त्यांचे क्लिनिक लोकप्रिय झाले.दुबई शारजा येथूनही कामगार त्यांच्या क्लिनिक मध्ये यायला लागले ! कामगारांची गर्दी वाढू लागली आणि म्हणून प्रथम शारजा आणि नंतर दुबईतही क्लीनिकने आपले पंख पसरले.मिळालेल्या या भरघोस प्रतिसादातून त्यांना स्फूर्ती मिळाली.बघता बघता इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला,त्याच्या शाखा सर्वत्र पसरल्या.ह्या वृक्षाच्या सावलीत असंख्य कामगारांना आधार मिळाला ,विश्वास मिळाला.हळूहळू  दुबईत ५,अजमान येथे ४,आणि शारजाला १ अशी एकूण १० क्लिनिक आणि फार्मासिज सुरु झाल्या. ‘न्यू सानिया ‘ च्या रुपाने ,गरीब कामगार वर्गासाठी परदेशात विश्वासाचे,आधाराचे जणू एक घरच निर्माण झाले.माफक फी आणि उत्तम सेवा ही त्यांच्या व्यवसायाची सूत्रे आहेत आणि त्यात डॉक्टर अजिबात तडजोड करत नाहीत.

त्या काळात कंपनीचे मालक कामगारांच्या आरोग्याविषयी काहीच काळजी घेत नसत.त्यांचा विमा उतरविणे,आरोग्य विषयक सर्व सुविधा पुरविणे याविषयी ते उदासीन असत.तसेच दुबई प्रशासनाने सुद्धा आरोग्य सेवा सक्तीची केली नव्हती,कोणतेही नियम कायदे केले नव्हते.५%पेक्षासुद्धा कमी कामगार विमा योजनेचा लाभ घेत असत.ज्यांना कंपनीकडून ही सुविधा मिळत असे ते कामगार नशीबवान समजले जात. इन्शुरन्स कंपन्या सुध्दा कामगारांच्या विम्याबद्दल उदार नव्हत्या.इन्शुरन्स कंपन्यांचे कार्यालय कामगारांच्या लेबरकॅम्प पासून खूप दूर.टॅक्सी भाडे परवडायचे नाही,त्यामुळे कामगार क्लेम करायचेच नाहीत.त्यामुळे इन्शुरन्स कंपन्याही खूश असत.कंपनीच्या मालकाला विम्याचे पैसे भरावे लागत नव्हते त्यामुळे मालकही खूश ! मधल्यामध्ये भरडला जात होता गरीब बिचारा कामगार !

हे विदारक सत्य हेरुन डॉ पैठणकरांनी bulk booking च्या तत्त्वावर कामगारांसाठी विमा योजना उपलब्ध करून दिली.त्यासाठी जिथे खूप कामगार काम करतात त्या मोठ्या ऑर्गनायझेशन्सना  group insurance package मिळवून दिले.डॉ पैठणकरांनी आरोग्य विमा पुरविणाऱ्या २००कंपनीज आणि फार्मसिजचे नेटवर्क तयार केले आहे.या नेटवर्कच्या माध्यमातून,४००००कामगारांना आरोग्यविम्याचा लाभ मिळवून दिला आहे.त्यासाठी Alliance Insurance ,Dubai Insurance,Noor Takaful ,Union Insurance अशासारख्या २० कंपन्यांशी त्यांचे करार झाले आहेत.डॉक्टरांनी हेल्थ इन्शुरन्सची सोय उपलब्ध करुन दिल्याने कामगारांना औषधे आणि वैद्यकीय सेवा मोफत मिळतातच शिवाय ऑपरेशन करावे लागल्यास त्यातही बरीच सूट मिळते.यूएई मध्ये कोठेही मोफत सेवा मिळतेच त्याचबरोबर या इन्शुरन्स स्कीमचा लाभ ते इंडिया,पाकिस्तान,श्रीलंका,फिलिपाइन्स या देशातही घेऊ शकतात .

वर्षातून दोनदा लेबरकॅम्पवर मेडिकल कॅम्प्स आयोजित केले जातात.गरजू कामगारांना मोफत तपासणी आणि औषधपाणी दिले जाते इतर सर्व महागाई वाढल्याने consultation fee ३० दिरहम केली आहे ,पण डॉक्टरांच्या हे लक्षात आले की ३० दिरहम फी देणेसुद्धा ह्या कामगारांना शक्य नाही.डॉक्टर आपल्या कामगारांना चिंतित पाहू शकत नाहीत,त्यामुळे क्लिनिक चे इतर सर्व खर्च त्यांनी कमी केले आहेत.

डॉ पैठणकरांची सर्व clinic एकदम साधी ! एकाच साच्याची,एकाच ढंगाची ! एकदम साधे इंटिरिअर ,त्यात कोणताही भपका नाही.झकपक फर्निचर नाही की गुळगुळीत मार्बलच्या टाईल्स नाहीत.किंमती पडदे नाहीत ,कोणतेही ग्लॅमर नाही.स्वच्छता आणि अद्ययावत उपकरणे ही त्यांच्या क्लीनिकची प्रमुख वैशिष्ट्ये !येणाऱ्या कामगाराला �