2005: 2 दिवसांची उत्तर रंग विषयक पाहिली भारतीय परिषद.
2007, 2013 2018 : संपूर्ण दिवसाच्या 4 परिषदा अनुक्रमे : न्यू जर्सी, लॉस एञ्जेळीस, ऑस्टिन आणि कनेक्तिकट
2005 ते 2018 : लॉस एंजेलिस, सान होजे, शिकागो, बोस्टन , कनेक्टिकट, नॉर्थ बे एरिया मराठी मंडल ईत्यदि ठिकाणी उतररंग विषयावर जनसभा ( townhallmeetings)
शिवाय फ्लॉरिडा येथील शांतिनिकेतन मध्ये 2 परिषदा.
9: बृहन्म्हाराष्ट्र मंडळासाठी पुढील बोधवाक्य तयार करण्यात पुढाकार :
एकमेकांचे धरुनी हात | सुखशान्तीची शोधू वाट ||
चला राहू आनंदात | आयुष्याच्या उत्तररंगात ||
10: उत्तर रंग नामदादर्शिका तयार करण्यात विद्या व मोहन रानडे यांचेबरोबर पुढाकार. (2013)
उत्तररंग आणि डॉ.अशोक सप्रे : संकल्पना आणि कार्य
कीर्तनात जसा पूर्व रंग असतो आणि उत्तर रंग , तसेच आपले आयुष्याचे दोन भाग.
आपले आतापर्यंतचे आयुष्य जसे रंगले तसेच आपले यापुढचे म्हणजे साठीनंतरचे आयुष्यही सुखशांतीचे ,आनंदाचे , अर्थपूर्ण आणि इंटरेस्टिंग कसे करावे या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी उत्तर रंग आहे. उत्तर रंग हा सर्व वयाच्या लोकांसाठी आहे. डॉ.अशोक सप्रे हे या संकल्पनेचे वकार्याचे शिल्पकार.
जनरल मोटर्स या प्रख्यात कंपनीत नोकरी चालू असतानाच, १९९१च्या बृ मा मं च्या अधिवेशनात उत्तर रंग या विषयावर एक चर्चा सत्र आयोजित करून त्यांनी हे काम सुरु केले. त्यानिमित्त या विषयाचा मराठी आणि भारतीय लोकांच्या दृष्टीने सर्वांगीण विचार त्यांनी केला. अनेक वर्षे या विषयाशी संबंधित संस्थाना व निवृत्त वसाहतींना भेटी दिल्या. नियतकालिके आणि पुस्तके वाचून अभ्यास केला. स्वत: व्यवसायातून निवृत्त झाल्यावर लॉस एन्जेलिस भागात या विषयावर विचार करण्यासाठी गट सुरु केला.
२००४ पासून मराठी समाजात लोकजागृतीसाठी वृत्तात उत्तर रंग सादर सुरु केले. ‘उत्तर रंग’ हे नाव ;ही अशोक सप्रे यांचीच कल्पना.
२००५ मध्ये अशोक सप्रे यांच्या नेतृत्त्वाखाली लॉस एन्जेलिस येथे या विषयावर दोन दिवसांची राष्ट्र्यीय परिषद झाली. अमेरिकेत झालेली ही पहिली भारतीय उत्तर रंग परिषद. त्याचा लाभ १६ राज्यातील १०० भारतीय लोकांनी घेतला. या परिषदेचा बोलबाला झाल्यामुळे या विषयाचे महत्त्व पटलेले काही लोक संपर्क आले. त्यांच्याशी झालेल्या विचार मंथनातून पुढे फ्लोरिडा मधील शांतीनिकेतन ही भारतीयांसाठी असलेली पहिली निवृत्त वसाहत सुरु झाली.
डॉक्टर सप्रे हे National Indo-American Association for Senior Citizens(NIAASC) या संस्थेच्या संचालक मंडळावर सध्या काम करतात.
त्यानंतर २००६ ते २०१४ या काळात सान होजे, लॉस एन्जेलिस, ऑस्टिन, न्यू जर्सी, शिकागो, टोरांटो, मराठी वैभव रेदिओ, बोस्टन ई. अनेक ठिकाणी या विषयावर परिषदा, सभा, चर्चा सत्रे अशा विविध प्रकारे उत्तर रंग या विषयावर लोकजागृतीचे कार्य डॉ. सप्रे करत आले आहेत. . त्यातून काही स्थानिक उत्तर रंग गट सुरु होत आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रसिद्ध केलेल्या उत्तर रंग नामदर्शिकेचे सहसंपादन डॉ. सप्रे यांनी मोहन रानडे व विद्या हर्डीकर सप्रे यांच्या बरोबर केले.
२०१५ मध्ये लॉस एंजेलिसच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी अधिवेशनास जोडून संपूर्ण दिवसाची उत्तर रंग परिषद अशोक सप्रे यांच्या नेतृत्त्वाखाली यशस्वी झाली.बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासात प्रथमच.या परिषदेमुळे अधिवेशनातील उत्तर रंग परिषदेची प्रथा सुरु झाली. यासाठी बोधवाक्य तयार केले त्याचे सह कवित्वाचे श्रेयही अशोक सप्रे यांनाच जाते.
उत्तर रंगासाठी २५ वर्षाचे परिश्रम, सातत्य आणि भविष्याचा वेळोवेळी घेतलेला वेध हे अशोक सप्रे यांचे वैशिष्टय आहे. प्रत्येक मराठी माणसाला उत्तर रंग जिव्हाळ्याचा वाटला पाहिजे हे सूत्र आहे.
एकमेकांचे धरुनी हात | सुखशान्तीची शोधू वाट ||
चला राहू आनंदात | आयुष्याच्या उत्तररंगात ||
हा मंत्र त्यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी तयार केला आहे.