‘गर्जे मराठी ग्लोबल‘

Anand Ganu Co-Founder and Chairman of two Pharmaceutical Manufacturing companies. Anand is the son of a school teacher. He started his career as a Head of Pharmacy Department, Eastern Province, Zambia. Anand is happily married for 38 years to Suneeta, his pharmacy college classmate. His new found passion is writing, and has two books to his name:

  • Enigma-The Life of Gma’
  • and
  • ‘India Travel Math’

Anand has travelled extensively to all corners of the world. Anand shares his travel experiences through his website ‘www.diyindiatravels.com, Do It Yourself India Travels’. This non-commercial portal is created to assist travellers who wish to travel independently. Anand works to create awareness for Cancer Prevention and early detection. In 2017 he held three Cancer Detection Camps for Women, in collaboration with Indian Cancer Society.

गर्जे मराठी ह्या पुस्तकाची निर्मिती हातात घेतली तेंव्हा त्या मागची आमची भूमिका एका शाहिराची होती . शूर माणसांच्या कर्तृत्वाचे पोवाडे रचले जातात, ते सादर केले जातात आणि त्यातूनच नव्या पिढ्यानी प्रेरणा घेऊन नवे शौर्य गाजविण्यासाठी पुढे सरसावयाचे असते. आपल्या अलौकिक कर्तृत्वाने सारे जग पादाक्रांत करणाऱ्या आणि जग पादाक्रांत करून परत मातृभूमीला येणाऱ्या मराठी माणसांच्या चित्तथराक यशगाथा ऐकणे , त्या इतरांना ऐकविणे आणि त्या पासून स्फुर्थी घेऊन आपल्या जीवनात यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणे कोणाला आवडणार नाही? ह्याच पार्श्वभूमीवरती गर्जे मराठी हि संकल्पना अवघे मराठीमानस आपल्या कवेत घेईल असा आम्हाला विश्वास होता. गेली दोन वर्षे गर्जे मराठीला मिळालेले प्रेम आणि यश, आमच्या ह्या उपक्रमाला सर्व देशविदेशातील मराठी बांधवानी दिलेला प्रचंड प्रतिसाद हेच सांगतो कि आमचा हा विश्वास अतिशय रास्ता होता. ह्याच विश्वासापोटी ‘गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ (Garje Marathi Global Platform) हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

०१ ऑगस्ट २०१७ रोजी वीर सावरकर सभागृह मुंबई येथे एक भव्य समारंभात गर्जे मराठीच्या पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. पदमविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर ह्या अविस्मरणीय समारंभाचे प्रमुख पाहुणे होते हि आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही ०१ ऑगस्ट २०१८ रोजी गर्जे मराठी २ आणि गर्जे मराठी १ ची मराठी आवृत्ती प्रकाशित केली. या पुस्तक प्रकाशनाचे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे झाले. डॉ आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि पद्मश्री डी वाई पाटील या समारंभाचे प्रमुख अतिथी होते. दोन वर्षांमध्ये गर्जे मराठीच्या एक मराठी आणि दोन इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन केले. इतकेच नव्हेतर महाराष्ट्रातील हजारो शालेय विद्यार्थ्यांपर्यंत हे ग्रंथ विनामूल्य पोहचविले.

गर्जे मराठी ग्रंथांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये शंभराहून अधिक जागतिकीर्तीमान महानुभावांची संक्षिप्त चरित्रे देशविदेशातील मराठी आणि अमराठी वाचकांपर्यंत पोहचवू शकलो. जगभराहून मान्यवरांकडून मिळालेली शाबासकी, वाचकांच्या प्रतिक्रिया आणि शालेय विद्यार्थ्यांकडून आलेली शेकडो पत्रे ह्यांच्यामुळेच आम्हाला ‘गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ (Garje Marathi Global Platform) हा जगत्व्याप्ती होण्याची क्षमता असणारा प्रकल्प हाती घेण्याचे धैर्य झाले आहे.

‘गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ (Garje Marathi Global Platform) विषयी थोडेसे

२०१६ पासून गर्जे मराठी आणि ग्रंथाली प्रकाशन ह्यांचं सहप्रवास सुरु झाला. कोणाचाही व्यासायिक दृष्टिकोन न ठेवता ग्रंथाली प्रकाशनाने गर्जे मराठी ह्या प्रकल्पाकडे फक्त आपली सामाजिक, वैचारिक आणि शैक्षणिक जबाबदारी समजून स्वतःला झोकून घेतले. दोन वर्षमध्ये गर्जे मराठीच्या एक मराठी आणि दोन इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन केले.

०१ ऑगस्ट २०१७ रोजी वीर सावरकर सभागृह मुंबई येथे एक भव्य समारंभात गर्जे मराठीच्या पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. पदमविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर ह्या अविस्मरणीय समारंभाचे प्रमुख पाहुणे होते हि आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही ०१ ऑगस्ट २०१८ रोजी गर्जे मराठी २ आणि गर्जे मराठी १ ची मराठी आवृत्ती प्रकाशित केली. या पुस्तक प्रकाशनाचे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे झाले. डॉ आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि पद्मश्री डी वाई पाटील या समारंभाचे प्रमुख अतिथी होते. दोन वर्षांमध्ये गर्जे मराठीच्या एक मराठी आणि दोन इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन केले. इतकेच नव्हेतर महाराष्ट्रातील हजारो शालेय विद्यार्थ्यांपर्यंत हे ग्रंथ विनामूल्य पोहचविले.

गर्जे मराठी ग्रंथांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये शंभराहून अधिक जागतिकीर्तीमान महानुभावांची संक्षिप्त चरित्रे देशविदेशातील मराठी आणि अमराठी वाचकांपर्यंत पोहचवू शकलो. जगभराहून मान्यवरांकडून मिळालेली शाबासकी, वाचकांच्या प्रतिक्रिया आणि शालेय विद्यार्थ्यांकडून आलेली शेकडो पत्रे ह्यांच्यामुळेच आम्हाला ‘गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ (Garje Marathi Global Platform) हा जगत्व्याप्ती होण्याची क्षमता असणारा प्रकल्प हाती घेण्याचे धैर्य झाले आहे.

विद्येची पूजा आणि भक्ती हि मराठी माणसाची ओळख आहे. मराठी माणसासाठी विद्याभ्यास हा सर्वप्रथम असतो. ह्याच आपल्या गुणवैशिष्ट्ययामुळे शैक्षणिक , व्यासायिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी माणूस जगभर उच्यपदस्थ आहे. अश्या ह्या आपल्या कर्तृत्ववान बंधू आणि भगिनींविषयी वाटणारा अभिमान व्यक्तकरण्यासाठी , त्यांचे रास्त असे कौतुककरण्यासाठीच ‘गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ (Garje Marathi Global Platform) अस्तित्वात आले आहे.

गर्जे मराठी हि प्रेमाची, विचारांची, भावनांची आणि आपुलकीची बांधिलकी आहे जिचे संकेतस्थळ www.garjemarathi.com हे दृश्य स्वरूप आहे. ‘गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ च्या माध्यमातून जगभरची मराठी मंडळी , अनिवासी मराठी आणि यश,ज्ञान व कीर्ती प्राप्तकरून देशावरील प्रेमामुळे, मातृदेशाची सेवाकरण्यासाठी ‘परत मातुभूमीला’ आलेले मराठी एकत्र येणार आहेत. गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ च्या माध्यमातून जगभरच्या मराठी तरुण तरुणींना , लहानथोरांना प्रेरणा मिळणार आहे. गर्जे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’ च्या माध्यमातून जगभरचे मराठी एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ह्या भावनेने एकत्र येणार आहेत.

गर्जे मराठी ह्या संकेत स्थळावर जगभरच्या मराठी माणसांची संक्षिप्त चरित्रे प्रकाशित केली जातील. हि चरित्रे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती आणि संबंधित व्यक्तीद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित असतील. ह्याशिवाय हायपरलिंक्स, YouTube लिंक्स , संबंधित व्यक्तीची व्हिडिओ मुलाखत सुद्धा ह्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जातील. गर्जे मराठी ह्या संकेत स्थळाचा हेतू सर्वे अनिवासी मराठी आणि परत मातृभूमीला मराठीची माहिती एकत्रित करणे हा आहे. त्यातून दर आठवड्याला निवडक ४-५ महत्वाच्यी व्यक्तिचरित्रे NEWSLETTER वर प्रकाशित होतील. संकेतस्थळावर दर्शविणारी प्रत्येक व्यक्ती मुख्य शब्दांच्या संचाद्वारे (Key words)शोधली जाऊ शकते.

www.garjemarathi.com हे संकेतस्थळ जरी इंग्लिश भाषेत असले तरी ग्रंथाली प्रकाशनच्या नियतकालिकांवर, NEWSLETTER मधील महत्वाची व्यक्तिचरित्रे मराठी भाषांतर स्वरूपात प्रकाशित केली जातील. त्याचप्रमाणे ह्या चरित्रांचे संकलित संच ग्रंथाली प्रकाशन दर सहामाही पुस्तकस्वरूपात प्रकाशित करेल.आमच्या ह्या प्रकल्पाला पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेळकर ह्यांचे प्रमुख मार्गदर्शन आहे. त्याचप्रमाणे श्री दिनकर गांगल , पद्मश्री गणपती यादव, डॉ भास्कर थोरात, श्री. नरेंद्र काळे ह्यांच्यासारखी विद्वान मंडळी आमच्या Advisory Honorary committee वर आहेत. ह्या सर्वांच्या मार्गदर्शना मुळे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्म’च्या यशाविषयी आम्हाला प्रचंड विश्वास आहे.Germany, France, Netherlands, UK, Finland, UAE, Kuwait, Bahrain, Oman, Mauritius, Singapore, China, Japan, Australia and USA आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक शहारा मधील प्रतिष्ठित मराठी बंधुभगिनींनी ह्या सामाजिक, वैचारिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अतिमहत्वाच्या, महत्वाकांक्षी प्रकल्पला विचाराने आणि कृतीने पाठिंबा देण्याची तयारी दाखविली आहे.

हे कार्य अतिशय मोठे आणि कठीण आहे. सर्वांचं सहभागाशिवाय हा प्रकल्प यशस्वी होणे नाही.”