NewsSalute to Tanuja Deepak Mokashi

Salute to Tanuja Deepak Mokashi ( Age 9)  who Donated her long locks to provide wigs for cancer patients and children with hair loss

 

कॅन्सर पेशंट बरा होण्यामागे केमोथेरपी या उपचारा बरोबरच त्या व्यक्तीची मानसिकता ही किती मोलाची असते नाही का ? मन सकारात्मक राहण्याकरता चेहरा प्रसन्न असणे चेहऱ्यावरील तेज तसेच राहणे हे आवश्यक असते. पण किमोथेरपी या उपचारादरम्यान डोक्यावरील केस पूर्णतः गळून जातात त्यामुळे आरशात बघताच मनाचे खच्चीकरण होतेमनावर नकारात्मक विचारांचा पगडा वाढतोबाहेरील जगात वावरणे, व्यवहार करणे कठीण होऊन जाते मग पेशंट खचत जातो ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पेशंट wig  घालून आपल्या चेह-याचे सौंदर्य पुर्ववत ठेवू शकतो. आधीच कॅन्सरची ट्रीटमेंट खर्चिक आणि त्यात हा wig चा खर्च गरजेचा होतोअशा वेळी जर उत्तम wig कमी पैशात मिळू लागला तर ते पेशंटला विशेषतः स्त्री वर्गाला विकत घेऊन तो वापरून समाजात वावरणे सोयीचे होईल मनास उभारी येईल

पण निरोगी स्त्रीला स्वतःचे मोठे केस कापून त्याचा त्याग करणे हे रुचेल असे नाही आणि रुचले तरी ते अमलात आणणे तितकेसे सोपे नाही. आमच्या नऊ वर्षाच्या नातीने म्हणजे तनुजा दीपक मोकाशी ने तिची पुण्याची ईशा काकू देवाघरी गेल्यानंतर तिच्या मनातील विचार "आपले लांबसडक काळेभोर केस पेशंटला देऊ शकतो कामाझे केस कापले तर माझ्या दिसण्यात फरक पडेल पण तेच दुसऱ्या कोणत्या पेशंटला मिळाल्यानंतर त्याला किती आनंद होईल !! मी परत  केस वाढवेन ..  तर मी donate करू शकते काअसे  प्रश्न विचारून तिची इच्छा बोलून दाखवली एवढ्या लहान वयात तिची ही उत्तम विचारांची मानसिकता तिच्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारामुळेअसणार हे जाणवलेया चिमुरडीने आपले आई-वडील काहीना काही दान करताना पाहिले असणार त्याचे महत्त्व तिला समजले असेल कारण लहान वयात मुले आई-वडिलांचे अनुकरण करताततिचा हा केस दान करण्याचा मानस तिच्या आई-वडिलांना म्हणजेच माझी मुलगी श्रद्धा जावई दीपक यांनी ताबडतोब त्यासंबंधीची माहिती गोळा करून तो योग्य पद्धतीने अंमलात आणून आमच्या नातीचे केस दान केले गेले याचे आम्हाला खूप कौतुकही वाटले आनंद वाटला अभिमान वाटला

तिच्याशी बोलल्यावर कळले की तिचे बघून बिल्डिंग मधल्या अजून दोघीनी पण ते केले ह्याचा तिला अजून जास्त अभिमान आहे. आज जर अशा प्रकारे स्त्रीवर्गाने केसांचा त्याग केला तर उत्तम wig खरोखरच स्वस्त होतील तनुजाचा हा त्याग आदर्शवत ठरेल

आजी-आजोबा या नात्याने तनुजाच्या या निर्णयाने आम्हाला समाधान वाटले त्यासाठी श्रद्धा दीपक यांचेही अभिनंदन. Hats'off तनुजातुझ्या विचारांची प्रगल्भता अशीच वाढत राहो यासाठी सदिच्छा 

आजी-आजोबा

सुलभा   संजय कुलकर्णी