NewsDr. Hemraj Yadav awarded prestigious Ramanujan Fellowship 2021 by Government of India

Dr. Hemraj Yadav awarded prestigious Ramanujan Fellowship  2021 by Government of India

Congratulations to Dr. Hemraj Yadav. (https://www.garjemarathi.com/member_details.php?member=Hemraj-Yadav )

Dr. Yadav leads Garje Marathi Seoul Chapter.

विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ भारत सरकार यांचेकडून प्रतिष्ठित रामानुजन फेलोशिपसाठी कोल्हापूरचे  सुपुत्र डॉ. हेमराज  यादव यांची निवड.

भारत सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी मंत्रालयाकडून परदेशात संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांना प्रतिष्टीत अशी रामानुजन फेलोशिप दिली जाते. यावर्षी या प्रतिष्टीत रामानुजन फेलोशिपचा मान मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे आणि सध्या दक्षिण कोरियातील डोंगुक विद्यापीठ सेऊल येथे संशोधन करणारे डॉ. हेमराज  यादव याना मिळाली आहे.

डॉ. हेमराज  यादव, सध्या डोंगुक विद्यापीठ सेऊल, दक्षिण कोरिया सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.    भारत सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीचा पुरस्कार जगभरातील हुशार भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना देण्यात येतो,  जे परदेशातून भारतात परत येऊ इच्छितात आणि भारतभरातील वैज्ञानिक पदांवर व्यस्त राहू इच्छितात अशा शास्त्रज्ञना हि फेलोशिप दिली जाते. जगभरतील भारतीय शास्त्रज्ञमधून अतिशय  मर्यादित वैज्ञानिकांना हि फेलोशिप दिली जाते. 

डॉ. यादव यांनी दक्षिण कोरियामध्ये ऊर्जा, पर्यावरण आणि जैव-चिकित्सा या विषयावर सात वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. त्यांनी सण २००६ साली दूधसाखर महाविद्यालय बिद्री येथून रसायनशास्त्रात पदवी तर २००९ साली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, येथून उपयोजित रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सन २०१४ साली प्रा. डॉ. सागर डेळेकर आणि  प्रा. डॉ. एस.एच. पवार (माजी कुलगुरू डी.वाय. पाटील विद्यापीठ)  यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय. पाटील विद्यापीठ मधून रसायनशास्त्रात पी.एच.डी. केली आहे. त्यानंतर त्यांनी २०१४ ते २०१७ मध्ये दक्षिण कोरियाच्या सेऊल विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल रिसर्चफेलो म्हणून काम केले होते. २०१७  पासून डॉ. यादव डोंगगुक विद्यापीठ सेऊल येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर संशोधनाचे काम करत आहेत. तसेच त्याणी काही काळ क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रा.लि. मध्ये दौंड येथे रासायनिक कंपनीमध्ये रसायनशास्त्रज्ञ पदावर देखील काम केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद् उस्मानाबाद येथे देखील संशोधन केले आहे. डॉ. हेमराज यादव यांचे आत्तापर्यंत  ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत, तसेच ३ आंतराष्ट्रीय पुस्तकांमध्ये अध्याय लिहले आहेत.  त्यांनी ३०  हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर केले आहे. कॅटालिसिस आणि पॉलिमर एमडीपीआय प्रकाशकातील विशेष विषयासाठी त्यांनी गेस्ट-एडिटर म्हणून काम करत आहेत. ते एशियन रिसर्च नेटवर्क, कोरिया आणि अमेरिकन केमिकल सोसायटीचे सदस्य आहेत. तसेच ते गर्जे मराठी ग्लोबलचे आणि  मराठी मंडळ कोरियाचे सदस्य आहेत. त्यांच्या  संशोधन कार्यामध्ये फोटोकॅटालिसिस, नॅनोमेटेरिल्स, बायोमेटीरल्स, ड्रग डिलीव्हरी, सुपरकैपेसिटर, इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर, गॅस सेन्सर इत्यादींचा विषयांचा समावेश आहे. आपल्या मायदेशी परत यावे आणि आपले कौशल्य येथे वापरावे अशी त्यांची  तीव्र इच्छा आहे. रामानुजन फेलोशिप अंतर्गत ते आपले पुढील संशोधन  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे लवकरच सुरु करतील. रामानुजन फेलोशिप मिळवून शिवाजी विद्यापीठमध्ये संशोधनाचे कार्य करणारे डॉ. यादव हे  पहिलेच  वैज्ञानिक असतील. डॉ. यादव अर्जुनवाडा (ता. राधानगरी) या गावाचे असून त्यांच्या शिक्षण आणि संशोधन कार्यासाठी त्यांचे कुटुंबीय, शिक्षक, मार्गदर्शक, मित्र-परिवार यांचे सहकार्य लाभले. तसेच रामानुजन फेलोशिप मिळवावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने डॉ यादव तसेच भारत सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळास अगदी कमी वेळेत योग्य ते सहकार्य केले.

For details about Ramanujan Fellowship : http://serb.gov.in/rnf.php